1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Good news for dear sisters you will get Rs. 6000

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, मिळणार 6000 रुपये

राज्याच्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अंतर्गत  बहिणींना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. लाभार्थी महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळण्यासाठी त्यांना ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.  राज्य सरकार कडून हे स्पष्ट करण्यात आले आहे की, लाभार्थी महिलांनी ईकेवायसी पूर्ण केल्यानंतरच पुढील हफ्ते मिळणार आहे. 
या योजने अंतर्गत अनेक महिलांच्या अर्जामध्ये तांत्रिक त्रुटी आढळून आले आहेत. या योजनेत काही महिलांनी सरकारी नौकरी किंवा पेन्शनधारक असे पर्याय निवडल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही आहे. अनेक महिलांचे हफ्ते डिसेंबर 2025 पासून रखडले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने ऑनलाईन दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही संपूर्ण पडताळणीची प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यात आली आहे. 
ज्या लाभार्थी महिलांचे मागील महिन्यांचे हफ्ते प्रलंबित आहे त्यांना ईकेवायसी केल्यांनतर सर्व हफ्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. चार महिन्यांचे हफ्ते थकल्यावर लाभार्थी बहिणींच्या खात्यात थेट 6 हजार रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे आवाहन राज्य सरकार कडून करण्यात आले आहे. 
या संदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. ईकेवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत 31 मार्च पर्यंत वाढविण्यात आली आहे. लाभार्थींनी 31 मार्च 2026 पूर्वी आवश्यक दुरुस्ती करून योजनेचा लाभ घेण्याचे महिलांना आवाहन केले आहे. 
Edited By - Priya Dixit 
 
पुढील लेख
LIVE: लाडक्या बहिणींना मिळणार 6000 रुपये