1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Womens account is likely to receive Rs 4500

बहिणीच्या खात्यात येणार 4500 रुपये?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण  या योजनेत दरमहा १५०० रुपये मिळतात. परंतु, काही तांत्रिक कारणांमुळे किंवा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे मागील काही हप्ते रखडले होते. त्यामुळे महिलांच्या खात्यात ४५०० रुपये येण्याची शक्यता आहे. अशी माहित समोर आली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते मिळाले नव्हते, त्यांना नोव्हेंबर आणि  डिसेंबर आणि जानेवारीचे रुपये एकत्रित मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच ज्या महिलांचे अर्ज उशिरा मंजूर झाले आहे आणि ज्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे पैसे मिळाले नव्हते, त्यांनाही बॅकलॉग म्हणून ही रक्कम मिळू शकते. अशी माहिती समोर आली आहे. 
तसेच जानेवारी २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला हे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारकडून मकर संक्रांतीच्या आसपास किंवा २६ जानेवारीच्या मुहूर्तावर हे पैसे देण्याचे नियोजन होते. अनेक ठिकाणी ही प्रक्रिया आता प्रगतीपथावर आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे काही जिल्ह्यांत निधी वितरणास उशीर झाला होता, जो आता टप्प्याटप्प्याने दूर केला जात आहे. तसेच हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत असल्याने, सर्व महिलांच्या खात्यात एकाच वेळी पैसे दिसणार नाहीत. 
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड