Covid-19 पासून सुटका मिळवण्यासाठी या सर्व गोष्टींची काळजी घ्या
कोविड 19 मुळे आज संपूर्ण देश त्रासलेले आहे. या पासून संरक्षणासाठी सर्वत्र लॉकडाऊनचे अनुसरण केले जात आहे. जेणे करून या विषाणूंपासून संसर्गाचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळेल. त्याचबरोबर आपल्या रोग प्रतिकारक शक्ती बळकट करण्यावरही जोर दिला जात आहे. जर एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर त्याच्यावर या विषाणूचा साधारणपणे परिणाम होत नाही, कारण त्याचे शरीर या रोगाशी लढायला सज्ज असतं.
कोरोनाच्या विषाणूपासून दूर राहण्यासाठी काही बदल करणे गरजेचे आहेत. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची गरज आहे. चला तर मग जाणून घेऊया की या कोरोनाच्या काळात कोणते बदल करून पुढे वाढायचे आहे.
*जास्त गोड धोड खाऊ नका. लक्षात ठेवा की हे आपल्या आरोग्यास हानिकारक होऊ शकतं. त्यासाठी या पासून लांबच राहणे चांगले.
*जर का आपल्याला निरोगी राहायचे असेल तर जंक फूड पासून लांबच राहावं. अशे बरेच लोकं आहे जे त्या शिवाय जगू शकतच नाही. पण आपण विचार करा की या लॉकडाऊन ने आपल्याला याचा शिवाय जगण्याची सवय लावून दिली आहे. या सवयी आंगीकार करा. लक्षात ठेवा की प्रोस्टेड आणि फ्रोजन खाद्य पदार्थ अनेक आजारांना जन्मदायक असतात, त्यापासून लांबच राहणे कधीही चांगले.
*लॉक डाऊनच्या दरम्यान आपण सध्या जिममध्ये जाण्यास असमर्थ असल्यास अस्वस्थ होऊ नका. घरीच आपण नियमाने व्यायाम करावं. ट्युटोरियल बघून देखील आपण व्यायाम करू शकता. जसे की स्क्वॉट्स, पुशअप, जम्पिंग जॅक इत्यादी.
*घराच्या स्वच्छतेची काळजी घ्या. लक्षात ठेवा की नियमित स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. याकडे दुर्लक्ष करू नये.
*शक्य असल्यास बागकाम करावं. आपल्याला आल्हाददायक ठेवण्यास मदत करेल.
*आपण दार उघडून आत किंवा बाहेर जात असल्यास आपले हात धुवायला विसरू नका.
*आपल्या मोबाइलला सेनेटाईज नियमाने करा.
*बाहेरून आल्यावर आपले कपडे बदला आणि हातांना चांगल्या प्रकारे स्वच्छ करा.