शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By वृजेन्द्रसिंह झाला|
Last Modified: शुक्रवार, 22 मे 2020 (18:00 IST)

कोरोनाच्या रुग्णांवर कसे उपचार केले जातात, जाणून घ्या ICU आणि क्रिटिकल केयर विभागाच्या मुख्य डॉक्टरांकडून

कोरोना म्हणजेच कोविड 19 मुळे जगभरात भीतीचे वातावरण आहेत, तसेच लोकांच्या मनात अनेक प्रश्न पण आहे. की कोरोनाच्या रुग्णांवर कसे काय उपचार केले जातात. त्यांना कोणत्या परिस्थितीमध्ये आणि केव्हा रुग्णालयात घेऊन जायचे, जेणे करून त्यांचे प्राण वाचतील. हेच सांगत आहे इंदूरच्या कोविड -19 रुग्णालय चोइथरामचे ICU आणि क्रिटिकल केयर विभागाध्यक्ष आणि चीफ कन्सल्टन्ट इंटेसिव्हिस्ट डॉ. आनंद सांघी.  
 
डॉ. आनंद सांघी यांनी वेबदुनियाशी खास संभाषणात सांगितले की सर्वात आधी तर प्रत्येकाने आपल्या मनातून कोरोना बाबतची भीती काढून टाकली पाहिजे आणि सामान्य लक्षण दिसतातच लगेच रुग्णालयात धाव घेतली पाहिजे. जेणे करून रुग्णाचा जीव वाचेल. ते म्हणाले की कोणत्याही रुग्णाच्या जीवावर त्यावेळी संकट येते ज्यावेळी तो वेळेवर रुग्णालयात पोहोचत नाही.  
 
बऱ्याच काळापर्यंत पीपीई किट घालणे फार कठीण :
डॉ. सांघी म्हणाले की चोइथराम रुग्णालयात कोरोना वॉर्डात 50 डॉक्टरांची एक समर्पित टीम काम करीत आहे. डॉक्टरांची टीम 6 -6  तासांच्या शिफ्टमध्ये काम करते. या मध्ये 2 ज्युनियर आणि 1 सीनियर डॉक्टर आहेत. एक आठवडा काम केल्यावर डॉक्टरांच्या टीम ला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाते. ते म्हणाले की उन्हाळाच्या दिवसात पीपीई किट घालून काम करणे फारच अवघड आहे. यामुळे वैद्यकीय दलाचे काही जण बेशुद्ध देखील झाले आहेत.  
 
कोरोनाच्या रुग्णांचे 4 प्रकार आहेत : 
ते म्हणाले की कोरोना महामारी वेगाने वाढणाऱ्या प्रभावामुळे आम्ही रुग्णांना 4 श्रेणीमध्ये विभाजित केले आहे. माईल्ड (सौम्य), मॉडरेट(मध्यम), सीव्हियर(गंभीर), व्हेरी सीव्हीयर (अत्यंत गंभीर). रुग्णालयाच्या मुख्य दारापासूनच रुग्णाचा उपचाराची प्रक्रिया सुरू होते. तेथेच ठरविले जाते की रुग्णाला सामान्य वार्डात उपचार दिले जाणार की ICU मध्ये.
 
डॉ. सांघी म्हणाले की A श्रेणी म्हणजे माईल्ड (सौम्य) प्रकारात अश्या रुग्णांचा समावेश आहे, ज्यांचा श्वास व्यवस्थित चालत आहे. त्याचबरोबर ऑक्सिजनचे प्रमाण देखील चांगले आहे. फक्त त्यांना ताप, सर्दी, पडसं सारखे त्रास होतं आहे. त्यांची तपासणीची रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेली असते. अश्या रुग्णांचे वार्डमध्येच उपचार केले जातात. अश्या रुग्णांना ICU ची गरज नसते.
 
B श्रेणी मधील रुग्ण म्हणजेच मॉडरेट (मध्यम) रुग्ण, अश्या रुग्णांविषयी बोलताना ते म्हणाले की या श्रेणी मधील रुग्णांचे ऑक्सिजन स्तराचे प्रमाण 95 पेक्षा कमी पण 90 पेक्षा जास्त असतं. यांना सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकं दुखी, खूप ताप भरणे या सारख्या तक्रारी असतात. यांना पण वॉर्डमध्येच उपचार दिलं जातं.  
 
त्यांनी सांगितले की सीव्हीयर (गंभीर) म्हणजेच C श्रेणींमध्ये येणाऱ्या रुग्णांचे उपचार फक्त ICU मध्येच केले जातात. या श्रेणीतील रुग्णांच्या रेस्पायरेटरी रेट (श्वासोच्छ्वासाचे) प्रमाण 24 ते 26 असतं, जे सामान्य पेक्षा 14 ते 16 पेक्षा खूपच जास्त असतं. या मध्ये ऑक्सिजनचे प्रमाण 90 टक्के (ऑक्सिजन शिवाय) कमी असतं. A आणि B श्रेणीमध्ये असणाऱ्या रूग्णांचे लक्षण तर यांच्यात असतातच.
 
डॉ. सांघी म्हणाले की व्हेरी सीव्हियर म्हणजे D श्रेणीमधील रुग्णांमध्ये रेस्पायरेटरी रेट (श्वासोच्छ्वासाचे) प्रमाण 30 ते 35 असतं. रुग्णांचे रक्तदाब देखील कमी असतं. रक्तात ऑक्सिजनचा पुरवठा देखील कमी असतो. ताप खूप जास्त असतो. आणि त्यांचे एका पेक्षा जास्त अवयव खराब झालेले असतात. अश्या रुग्णांना सुरुवाती पासूनच ICU मध्ये ठेवतात.


 
कोरोनाला घाबरून जाऊ नका:
ते म्हणाले की हा रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो. म्हणून या बद्दल जागरूकता असणे खूप महत्त्वाचे आहे. या आजाराची भीती बाळगण्याची गरजच नाही. समजूतदारीने मास्क, सोशल डिस्टेंसिंग (सामाजिक अंतर) ठेवूनच जिंकू शकतो. डॉ. सांघी म्हणाले की आपल्याला मास्क जीवनशैलीतील एक भाग बनवायचा आहे.
 
रिकव्हरी दर चांगला आहे : 
डॉ. सांघी म्हणाले की चोइथराम रुग्णालयात रिकव्हरी दर सुमारे 80 टक्के आहे. इथे 150 ते 160 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. यापैकी तर 55 ते 60 रुग्ण तर थेट ICU मध्ये दाखल झाले होते. या मधील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी सांगितले की सुरुवातीच्या टप्प्यात गंभीर असलेले रुग्णच रुग्णालयात पोहोचले होते. मे च्या महिन्यात मात्र मृत्यूचे दर कमी झाले आहे. आधीच्या तुलनेत लोकांमध्ये जागरूकता आली आहे.