सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : सोमवार, 25 मे 2020 (13:01 IST)

नवतपा म्हणजे काय, त्यामुळे उष्णता का वाढते? जाणून घ्या

प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात नवतपाला सुरुवात होते. यंदा 25 मे रोजी नवतपा सुरू होत आहे. नवतपा मध्ये पृथ्वीवर उष्णता प्रचंड वाढते. हिंदू ज्येष्ठ महिन्यात नवतपा येतं. 

नवतपा काय आहे आणि या मुळे उष्णता का वाढते? जाणून घेऊया थोडक्यात याबद्दल माहिती. 
 
नवतपा म्हणजे काय : सूर्य ज्यावेळी रोहिणी नक्षत्रात 15 दिवसांसाठी येतो, त्यावेळी त्या 15 दिवसामधील सुरुवातीचे 9 दिवस नवतपा म्हटले जातात. या 9 दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारे पाऊस आणि थंड वारं नसल्यास मान्सूनमध्ये चांगला पाऊस येणार असे मानले जाते. 
 
असे का होते : सूर्य 12 राशी आणि 27 नक्षत्रांमध्ये प्रवास करत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य कुंडलीत ज्या ग्रहांबरोबर बसतो, त्याचा प्रभाव कमी करून देतो. रोहिणी 
 
नक्षत्राचे अधिपती चंद्रमा आहे. अश्या वेळी जेव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करतो तेव्हा तो चंद्राचा थंडावा संपवून उष्णता वाढवतो. त्यामुळे पृथ्वीला थंडावा मिळत नाही आणि उष्णता प्रचंड वाढते. 
 
नवतपाच्या वेळी सूर्य किरणं थेट पृथ्वीवर येतात ज्यामुळे तापमानात वाढ होते. या उच्च तापमानामुळे मैदानी क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र बनते जे समुद्री लाटांना आकर्षित करतं. यामुळे अनेक ठिकाणी थंड, वादळ आणि पाऊस येण्याची दाट शक्यता असते. या वेळी वारं वाहत असलेले चालते पण पाऊस नसावा. असे झाल्यास पाऊस व्यवस्थित होईल. असं म्हणतात की चांगल्या प्रकारे शिजवलेल्ल्या अन्नाची चव चांगलीच येते.