शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 25 मे 2020 (17:16 IST)

भाई मैं ठेके से घर तक तो पहुँचा सकता हूँ, सोनू सूदचे हे ट्विट व्हायरल

अभिनेता सोनू सुद सध्या चर्चेत आहे कारण त्याने परराज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचवण्याची ‘घर भेजो’ मोहिम हाती घेतली आहे. लॉकडाऊनमध्ये श्रमिकांना आपल्या राज्यात जाण्यात अडचणी येत आहेत. यासाठी सोनूने पुढाकार घेतला असून अडकलेल्या मजुरांना घरी पोहचवण्यासाठी बस गाड्यांची सोय करताना दिसत आहे. 
 
सोनू थेट ट्विटवरुन मदत करतानाही दिसत आहे. शक्योतर तो प्रत्येक मदतीसाठी आलेल्या ट्वीटला प्रतिसाद देत आहे. सोनूच्या कामाने प्रभावित होऊन महाराष्ट्र राज्यातील कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन त्याचे कौतुक केलं आहे. तसेच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनाही सोनूचे कौतुक केलं आहे.
 
सोनू मदतीचा हात पुढे वाढवत आहे असे बघितल्यावर एका मद्यप्रेमीने थेट सोनूची मदत मागितली. या व्यक्तीने “सोनू भाइ में अपने घर में फँसा हुआ हूं ।मुझे ठेके तक पहुंचा दो (सोनू भावा, मी माझ्या घरात अडकलो आहो. मला दारुच्या दुकानापर्यंत पोहचव) असं ट्विट केलं होतं.
 
कमाल म्हणजे सोनूनेही या मजेदार ट्विटला तितकच भन्नाट उत्तर देत म्हटले की “भाई मैं ठेके से घर तक तो पहुँचा सकता हूँ । ज़रूरत पड़े तो बोल देना“ म्हणजे की भावा मी तुला दारुच्या दुकानातून घरी पोहचवू शकतो. गरज लागली तर सांग.