1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 9 मे 2020 (12:19 IST)

तामिळनाडू: सर्व दारु दुकानं बंद करण्याचे आदेश, होम डिलिव्हरीची परवानगी

Madras HC
मद्रास हाय कोर्टाने तामिळनाडू सरकारला राज्यातील सर्व दारुची दुकानं बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ऑनलाइन दारुची विक्री आणि होम डिलिव्हरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
 
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नसल्याने राज्यातील सर्व दारू दुकानं बंद करण्याचा आदेश दिला आहे. गुरूवारी पहिल्यांदा तामिळनाडूमध्ये दारुची दुकानं सुरू झाली होती. पहिल्याच दिवशी जवळपास १७० कोटी रुपयांच्या दारुची विक्री तामिळनाडूमध्ये झाली. 
 
पण शुक्रवारी मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूमधील सर्व 3,850 दारु दुकानं बंद करण्याचा आदेश दिला आहे. याचसोबत लॉकडाउन संपेपर्यंत दारुची दुकानं बंदच ठेवावीत असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.