शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified मंगळवार, 28 जानेवारी 2020 (10:12 IST)

बाप्परे, पोटातून चक्क अर्धा किलो केस, शॅम्पूचे रिकामे पाऊच निघाले

तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये 13 वर्षीय मुलीच्या पोटातून चक्क अर्धा किलो केस आणि शॅम्पूचे रिकामे पाऊच काढण्यात आले. “मुलीच्या जवळील व्यक्तीचे निधन झाल्यामुळे तिला मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे ती केस आणि शॅम्पूचे पाऊच खात होती. जे सर्व पोटात जमा झाले होते”, असं डॉक्टरांनी सांगितले. 
 
कोईम्बतूरच्या व्हीजेएम रुग्णालयात जेव्हा डॉक्टरांनी मुलीच्या पोटाचा एक्सरे काढला असता तिच्या पोटात चेंडू सारखी वस्तू असल्याचे दिसले. त्यामुळे तिच्या पोटात दुखत होते. यानंतर डॉक्टरांनी अँडोस्कोपीद्वारे पोटातील ती वस्तू बाहेर काढण्याचे ठरवले, पण हा प्रयत्न अयशस्वी ठरला.
 
अँडोस्कोपीमध्ये अपयश आल्याने रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या पथकाने तिच्यावर शस्त्रक्रिया करत पोटातील वस्तू बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. जेव्हा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली तेव्हा त्यांना धक्का बसला. कारण तिच्या पोटात चेंडू आहे असा डॉक्टरांचा समज होता. पण तिच्या पोटातून केसांचा बुचका निघाला. या केसांचे वजन अर्धा किलो होते.