गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

आता केवळ साडी किंवा सलवार-कमीज दुपट्टा, असा असेल ड्रेसकोड

महिलांसाठी नवा फर्मान जारी करण्यात आला आहे की त्यांनी साडी किंवा सलवार-कमीज परिधान करुनच ऑफिसला यावं. हा विचित्र फर्मान तामिळनाडू सरकरानं काढलं आहे.
 
तामिळनाडूत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे. आता कोणतेही कपडे घालून कामावर येता येणार नाही. महिलांनी साडी किंवा सलवार-कमीज दुपट्टा परिधान करणे अनिवार्य आहे. भारतीय परंपरेची झलक सरकारी कार्यालयातही पाहायला मिळावी, या उद्देशानं सरकारनं हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. 
 
या फर्मानप्रमाणे महिला कार्यालयात साडी, सलवार-कमीज आणि दुपट्टा परिधान करू शकतात तर पुरुष शर्ट-पँट किंवा पाश्चिमात्य कपडे परिधान करू शकतात. याशिवाय कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये इतर कोणत्याची प्रकारचे कपडे परिधान करण्यास अनुमती नाही. 
 
आता कर्मचाऱ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या या ड्रेस कोडची सर्वत्रच चर्चा आहे. सरकारच्या या आदेशावर अनेक लोक टीका करत आहे.
 
कर्मचाऱ्यांना देखील हा निर्णय फारसा पटलेला नाही. त्यांच्यात नाराजी आहे आहे हा निर्णय पूर्णपण अयोग्य असल्याची चर्चा आहे. तर काही कर्मचाऱ्यांनी नेत्यांदेखील ड्रेसकोड असावे अशी मागणी केली आहे.