बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलीनीकरण होणार नाही

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्त्वाची बैठक आज राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या  उपस्थितीत मुंबईत पार पडली. बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

विधानसभेबाबत जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरला नाही. निवडणूक काँग्रेससोबत एकत्र लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. निवडणुकांसाठी १०० दिवस राहिले आहेत. या निवडणुकीत तरूणांना अधिकाधिक संधी देणार, पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विजयाचे लक्ष्य समोर ठेवणार असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही. ही निव्वळ अफवा आहे. ही बातमी माध्यामात कशी आली याबाबत देखील आम्ही विचार करत आहोत, असे पाटील म्हणाले.