बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मे 2019 (09:34 IST)

राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का?

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. आता राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबतच्या चर्चा सुरु झाली आहे. दोन्ही पक्षाच्या विचारधारेत मोठा फरक नसल्याने पक्ष विलीन करण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. 
 
दोन्ही पक्षांनी मिळून केंद्र आणि राज्यात सरकार चालविले. त्यात सुरुवातीला उपस्थित झालेला सोनिया गांधी ह्या परदेशी असल्याचा मुद्दा आता संपला आहे. याआधी दोन्ही पक्षाची ताकद महाराष्ट्रात समान होती. त्यावेळी पक्ष विलीन करणे शक्य नव्हते. मात्र, आता दोन्ही पक्षाची अवस्था कमजोर झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी पूर्वी दोन्ही पक्षांची एकजूट झाली तर भाजपला टक्कर देणे सोयीचे होईल, असा अंदाज बांधून राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबतच्या चर्चेने जोर पकडला आहे.