बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मेट्रो आणि बसमध्ये महिला करू शकतील मोफत प्रवास

दिल्लीत पुढील महिन्यात होणार्‍या विधानसभा निवडणुका लक्षात घेता सर्व पक्षांची तयारी सुरू झाली आहे. मतदातांना आकर्षित करण्यासाठी आम आदमी पार्टी (आप) ने महिलांसाठी मेट्रो आणि  शासकीय बसमध्ये मोफत प्रवास सेवा प्रदान करण्याची तयारी केली आहे. 
 
दिल्ली सरकारचा हा निर्णय लागू झाल्यास यात प्रवास करण्यासाठी महिलांना तिकिट घेण्याची गरज नाही. तकनीक अडचण नसल्यास सहा महिन्यात योजना लागू होऊ शकते. दिल्ली सरकारने यासाठी मेट्रो रेल कॉरपोरेशन (डीएमआरसी) कडून प्रस्ताव मागितला आहे.
 
बातमीप्रमाणे आपने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला विचारले की महिलांसाठी ही सुविधा कशा प्रकारे लागू करता येईल. यासाठी मोफत पास सुविधा देण्यात येईल की इतर मार्ग शोधावा लागेल. 
 
ही योजना लागू झाल्या दिल्ली सरकारला दरवर्षी 1200 कोटी रुपये अतिरिक्त वहन करावे लागेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे..
 
दिल्ली सरकार मेट्रोसह बसमध्ये देखील ही योजना लागू करत पाहत आहे. डीटीसी आणि क्लस्टर स्कीम बसमध्ये ही योजना लागू करण्यास कोणत्याही प्रकाराची अडचण येणार नाही. उल्लेखनीय आहे की बस आणि मेट्रोने 33 टक्के महिला प्रवास करतात.