शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

नवर्‍याचं धडावेगळं शिर घेऊन पोलिस स्टेशन पोहोचली पत्नी

women reached police station
अनेक वर्षांपासून पतीच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून पत्नीने त्याची हत्या केली. नंतर नवर्‍याचं कापलेलं शिर घेऊन पोलिस स्टेशन गाठलं. हे प्रकरण मंगळवारी आसामच्या लखीमपूर जिल्ह्यात घडलं आहे. 
 
माझगावमध्ये रहाणारी महिला एक प्लास्टिक बॅग घेऊन पोलिस चौकीत आली. त्या पिशवीत तिच्या नवऱ्याचं कापलेलं मुंडक होतं. आरोपी गुणेश्वरी बार्काटाकीने (४८) पती मुधीरामची (५५) हत्या केल्याची कबुली दिली. 
 
पत्नीने स्थानिक चॅनल्सला सांगितले की अनेकवर्ष मुधीराम मारहाण करत होता. अनेकदा त्याने मला कुल्हाडीने जखमीही केले होते. मी त्याला कधीपासून सोडण्याचा विचार करत होते पण मुलांमुळे वेगळं होता आले नाही. शेवटी मला हा त्रास असह्य झाल्यावर मी त्याला मारले. मी असे केले नसते तर त्याने माझी हत्या केली असती.
 
पाच मुलांची आई गुणेश्वरीने कुल्हाडीने त्यावर हल्ला करत हत्या केली. नंतर त्याचे धडावेगळे डोकं घेऊन पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशनात गेली.