इंडियन फार्मर फर्टिलायझर को आॅपरेटिव्ह लिमिटेडच्या इतिहासात प्रथमच महिला संचालक निवड
जागतिक पातळीवर इंडियन फार्मर फर्टिलायझर को आॅपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को), नवी दिल्ली या संस्थेच्या जवळपास पन्नास वर्षांच्या इतिहासात प्रथम महिला संचालक निवडून आल्या आहेत. यामध्ये नाशिक येथील रहिवासी असलेल्या साधना जाधव बहुमताने विजयी झाल्या आहेत. साधना यांचा विंचूर येथील ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला आहे.
इफ्कोच्या संचालकपदाची निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. संस्थेच्या पन्नास वर्षांचा कार्यकाळात संस्थेच्या संचालक मंडळात अजूनपर्यंत एकाही महिलेला संधी मिळाली नव्हती. मात्र साधना जाधव यांच्या रुपाने प्रथमच महिला संचालकपदी विराजमान झाली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वात कौतुक होत आहे.
साधना यांचा नागरी सत्कार झाला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आमदार नितीन भोसले, स्टेट मार्केटींग मॅनेजर नायब,महेंद्र काले,मनोहर देवरे,आत्माराम कुंभार्डे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, आदी उपस्थित होते.