शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2019
Written By
Last Updated : सोमवार, 20 मे 2019 (12:58 IST)

वर्ल्डकप इतिहासाशी संबंधित या 10 मनोरंजक गोष्टी आपल्याला माहीत आहे का?

30 मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये वर्ल्डकपचा 12वा सीझन सुरू होणार आहे. उद्घाटन सामना यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लंडनमधील ओव्हल ग्राउंडमध्ये खेळला जाईल. जगभरातील क्रिकेट प्रेमी उत्सुकतेने वर्ल्डकपची वाट पाहत आहे. तर मग चला आपल्याला वर्ल्डकप इतिहासाशी संबंधित 10 मनोरंजक गोष्टी सांगू, ज्या कदाचित आपल्याला माहीत किंवा आठवत नसतील.
 
1. वेस्टइंडीजच्या क्लाईव्ह लॉईड (1975,1979) आणि ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंग (2003, 2007) ने आपल्या नेतृत्वाखाली दोनदा आपल्या संघासाठी वर्ल्डकप जिंकून रेकॉर्ड बनविला.
 
2. भारतीय गोलंदाज चेतन शर्मा यांच्या नावावर वर्ल्डकपमध्ये प्रथम हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड आहे. 1987 मध्ये त्यांनी हे यश मिळविले होते. 
 
3. नेदरलँडचे नोलन क्लार्क (47 वर्षे 257 दिवस) 1996 मध्ये वर्ल्डकप खेळणारे सर्वात वयस्क खेळाडू बनले.
 
4. सलग 3 किताब मिळविण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियन संघाच्या नावावर आहे. हा संघ सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन बनला आहे.
 
5. भारत हा एकमेव असा देश आहे जो 60 ओवर (1983) आणि 50 ओवर (2011) मध्ये देखील वर्ल्ड चॅम्पियन बनला.
 
6. भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या नावावर 5 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 2278 धावा बनवायचा रेकॉर्ड आहे.
 
7. 237 धावा वर्ल्डकपचा सर्वोच्च वैयक्तिक स्कोर आहे, जे न्यूझीलंडच्या मार्टिन गुपटिलने 2015 मध्ये वेस्टइंडीज विरुद्ध बनवला होता. 
 
8. सर्वाधिक 372 धावांची भागीदारी करण्याचा रेकॉर्ड वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्युअल्सच्या नावावर आहे. या दोघांनी झिंबाब्वेविरुद्ध हे  यश मिळवले. 
 
9. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्ग्राने वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 71 विकेट्स घेतले.
 
10. सर्वाधिक 54 बळी घेणारे श्रीलंकेचे यष्टीरक्षक कुमार संगकारा आहे.