मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

अंकशास्त्राप्रमाणे जाणून घ्या कोणत्या रंगाचा पेन आपल्यासाठी ठरेल भाग्यशाली

आपला मूलांक 1 असल्यास आपण गोल्डन रंगाचा पेन वापरायला हवा, याने नक्की यश मिळेल. सोबतच जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतील. 
 
2 अंक असणार्‍यांनी पांढरा किंवा सिल्वर रंगाचा पेन वापरावा. याने भाग्य मजबूत होईल आणि जीवनात सुख-शांती लाभेल. 
 
3 मूलांक असणार्‍यांनी गोल्डन रंगाचा पेन वापरावा याने भाग्य उजळेल आणि जीवनात आनंद वाढेल. 
 
4 अंक असणार्‍यांनी तपकिरी रंगाचा पेन वापरवा. याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतील आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर होईल. 
 
5 मूलांक असणार्‍यांसाठी हिरवा रंग अत्यंत शुभ ठरेल. याने जीवन सोपं होईल आणि सर्व कष्ट दूर होतील. 
 
6 मूलांक असणार्‍यांसाठी चमक असणारी वस्तू जडित पेन वापरावा. नग लागलेले पेन अश्या लोकांचे भाग्य चमकवून देईल. इतकं यश मिळेल की मागे वळून बघण्याची गरज भासणार नाही. 
 
7 मूलांक असणार्‍यांनी ग्रे रंगाचा पेन वापरावा. याने रागावर नियंत्रण राहील आणि जीवनात शांती नांदेल. सर्व अडचणी दूर होती आणि कार्यांमध्ये यश मिळेल. 
 
8 मूलांक असणार्‍यांनी डार्क रंगाचा पेन वापरावा. काळा किंवा गडद निळा रंग देखील योग्य ठरेल. याने जीवनातील सर्व अडथळे दूर होती आणि आनंदात वेळ घालवाल. 
 
9 मूलांक असणार्‍यांसाठी लाल रंगाचा पेन शुभ ठरेल. लाल रंगाचा पेन वापरल्याने सर्व दुख दूर होतील आणि सर्व कामांमध्ये यश गाठाल. या व्यतिरिक्त अडकलेले काम पूर्ण होतील.