शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

मूलकांप्रमाणे निवडा करिअर, यश गाठाल

मूलांक 1
मूलांक 1 असणारे व्यक्ती महत्त्वाकांक्षी असतात. त्यांच्यातील गुण म्हणजे ते कधी पराजय स्वीकार नाही आणि संघर्षाला सामोरा जाणारे असतात. अपयशाला घाबरत नाही आणि लपवत देखील नाही. आव्हान स्वीकारणे, राजकारण, भाषेवर पकड आणि अनेक लोकांना संबोधित व बांधण्याची क्षमता अर्थातच नेतृत्व क्षमता, प्रबंधन, प्रशासन, नवीन विचारांचे सृजन आणि प्रतिपादनाची क्षमता.
 
हे लोकं स्वत:ला व्यवसाय, राजकारण, लीडरशिप (नेतृत्व), मॅनेजमेंट गुरु (प्रबंधन गुरु) बनू शकतात.
 
मूलांक 2
मूलांक 2 असणार्‍या व्यक्तीचे काही गुण म्हणजे कला व मनोरंजना प्रती ओढ, ममता, कोणतेही कार्य व्यवस्थितपणे करण्याची इच्छा व क्षमता आणि न्यायप्रियता. आपण भावनिक रूपात एकच दिशेत विचार करू पावता आणि इतर पैलूंकडे दुर्लक्ष होतं.
 
हे लोकं कला, मनोरंजन, न्याय, समाजसेवा, 9 ते 5 असणारी जॉब करू शकता आणि हे लोकं राजकारणापासून खूप दूर राहतात.
 
मूलांक 3
मूलांक 3 असणारे नेतृत्व करणारे असतात. ते मोठ्या संस्थांमध्ये मोठ्या पदावर आसीन असतात. रचनात्मकता, कलात्मकता आणि सामाजिक कार्यात यांची विशेष रुची असते.अशा लोकांनी सामान्य संस्था किंवा व्यवसाय करू नये कारण अशात हे लोकं संतुष्ट राहू शकत नाही.
 
या लोकांसाठी कला, रचनात्मक, राजकारण, समाजसेवा, उच्च पदासीन जॉब, बँक जॉब, वित्त व्यवसाय किंवा इतर चांगला जॉब योग्य ठरतो.
 
मूलांक 4
मूलांक 4 असणार्‍या व्यक्तीसमोर येणारा प्रत्येक मुद्दा ते वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. ते स्वतंत्र विचारधारा असणारे, सामान्य लोकांपेक्षा जरा वेगळे, समाजात प्रचलित प्रतिष्ठित विचारधारा किंवा प्रचलन अंधभक्तसारखे न पाळणारे तसेच नवीन विचारधारा निर्माण करणारे असतात. यांचे विचार अगदी नवे असतात आणि नवीन प्रकारे ते नवीन विचारांचे सृजन करतात.
 
या लोकांसाठी हाय-रिस्क व्यवसाय, जुगार-सट्टा किंवा लॉटरी, कला, अभिनय, व्यवसाय, जॉब काहीही योग्य ठरू शकतं केवळ हे निर्धारित प्रकारे काम करण्याऐवजी आपल्या हिशोबाने काम करतात. 
 
मूलांक 5
मूलांक 5 असणार्‍या व्यक्तीचे गुण आहे शीघ्र मैत्री करणे, चांगला संवाद, लोकांशी योग्य रित्या भेटीगाठी, स्थापित व्यवसायात रुची घेणे. आपण रिस्क घेऊ इच्छित नसता परंतू रिस्क घेऊन कम्युनिकेशन स्किल्स संबंधित व्यवसाय सुरू केला तर फायद्यात राहू शकता. अनेक स्थिर होऊन जातात, थांबून जातात यामुळे प्रगती थांबते. म्हणून रिस्क घेणे आवश्यक आहे.
 
या लोकांसाठी कम्युनिकेशन स्किल्स संबंधित व्यवसाय जसे काउन्सलिंग, कोचिंग, टीचिंग, स्टॉक मार्केट-स्टॉक ट्रेडिंग योग्य ठरेल.
 
मूलांक 6
मूलांक 6 असणार्‍या व्यक्तीचे गुण आहे जसे निरोगी शरीर, चमत्कारी पर्सनॅलिटी, फेमस आणि लोकप्रिय, चांगला व्यवहार, लोकांना हँडल करण्याची क्षमता. सोबतच आलस्य, निर्णय घेण्याच्या क्षमतेची कमी. आळशी असल्याने हे दुसर्‍यांवर निर्भर होऊन सेल्फ-डिसीजन न घेणे हे काही दुर्गुण आहे.
 
लक्झरी किंवा फँसी आयटम्सचा व्यवसाय, मनोरंजन किंवा एंटरटेनमेंट लाइनचा व्यवसाय, किंवा स्पोर्ट्स क्षेत्रात जाऊ शकतात. स्वत:च्या विवेकाने निर्णय घेऊन व्यवसाय करावा. 
 
मूलांक 7
मूलांक 7 असणार्‍यांचे अध्यात्माकडे अधिक कळ असतं. हे चांगले सल्लाकार, ट्रॅव्हल एजेंट, रिसर्चर, कलाकार, इंटेलेक्चुयल आणि उच्च शिक्षा प्राप्त करणारे असतात. कार्यात आणि व्यवसायात नवीन मापदंड स्थापित करतात. लोकांमध्ये अधिक प्रसिद्ध असतात.
 
हे लोकं ज्या संस्थेत असतात तिथे चांगले मापदंड स्थापित करतात. हे योग्य रिसर्चर, ट्रॅव्हल, कन्सलटंट असतात.
 
मूलांक 8
मूलांक 8 असणार्‍या व्यक्तीला चुकीचं समजलं जातं. उच्च कोटीच्या आध्यात्मिक आणि सांसारिक सुख प्राप्तीची इच्छा बाळगणारे हे लोकं अनेकदा चूक निर्णय घेतात ज्यामुळे नंतर पश्चात्ताप होतो. आणि यांना चुकीचं गृहीत धरलं जातं.व्यवसायात अनेकदा अनिर्णयाची स्थिती बनल्यामुळे खूप वेळाने योग्य निर्णय घेऊ पावतात. यश प्राप्तीसाठी योग्य व्यक्ती किंवा संस्थेची सल्ला घेऊन काम करावे तर खासगी आणि व्यावसायिक जीवनात यश मिळू शकेल.
 
या लोकांसाठी स्टील, मेंटल, आर्किटेक्चर, राजकारण कला, रियल एस्टेट मध्ये कार्य करणे योग्य ठरेल.
 
मूलांक 9
मूलांक 9 असणार्‍या व्यक्तीचे गुण म्हणजे क्षत्रिय, साहसी व संघर्षाला न घाबरणारे. हे संघर्षमय जीवन जगणारे असतात. यांचे जीवन सरळ सोपे नाही. शत प्रतिशत दिल्याशिवाय यश हाती लागत नाही. कायद्यात अडकून राहतात. कौटुंबिक किंवा खाजगी जीवनात परेशानी जाणवते. आपल्याला अनुशासित आणि नियमित जीवनाने यश मिळू शकेल. यांची शारीरिक संरचना (फिजिकल फिटनेस) चांगली असते. लक्ष भटकू देऊ नका तरच विजय मिळेल. 
 
हे लोकं स्पोर्ट्स, आर्मी, पॉलिटिक्स, मनोरंजन आणि कला क्षेत्रात नाव कमावू शकतात.