बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

वाहन खरेदी करत असाल तर जाणून घ्या आपल्या लकी कलर

मूलांक प्रमाणे जाणून घ्या कोणत्या रंगाचे वाहन आपल्यासाठी ठरेल भाग्यशाली
 
आपला मूलांक किंवा भाग्यांक 1 असल्यास आपल्यासाठी पिवळा, सोनेरी किंवा क्रीम रंगाचे वाहन खरेदी करणे योग्य ठरेल. निळा, तपकिरी, जांभळा किंवा काळा रंग खरेदी करणे टाळा.
 
मूलांक किंवा भाग्यांक 2 असणार्‍या जातकांसाठी पांढरा किंवा हलक्या रंग योग्य ठरतील. लाल किंवा गुलाबीकडे आकर्षण निर्माण होत असलं तरी हलके रंग घेणे फायदेशीर ठरेल.
 
3 या भाग्यांक किंवा मूलांकाचे जातक पिवळा, जांभळा, निळा किंवा गुलाबी रंग पसंत करू शकता. या जातकांनी हलके रंग, पांढरा किंवा तपकिरी रंगाचे वाहन खरेदी करू नये.
 
मूलांक किंवा भाग्यांक 4 असणार्‍या जातकांसाठी निळा किंवा तपकिरी योग्य रंग आहे. गुलाबी किंवा काळा आपल्यासाठी शुभ रंग नाही.
 
5 अंक असणार्‍या जातकांसाठी पिवळा, गुलाबी किंवा काळा अशुभ ठरू शकतात. आपण हलक्या रंगाचे, पांढरे किंवा तपकिरी रंगाचे वाहन खरेदी करावे.
 
मूलांक किंवा भाग्यांक 6 असल्यास हलका निळा, गुलाबी किंवा पिवळा रंग योग्य ठरेल. या लोकांनी काळ्या रंगाचे वाहन मुळीच खरेदी करू नये.
 
आपला मूलांक किंवा भाग्यांक 7 असेल तर वाहनाचा रंग निळा किंवा पांढरा शुभ ठरेल.
 
मूलांक किंवा भाग्यांक 8 असणारे जातक काळा, निळा, तपकिरी किंवा जांभळा या रंगाचे वाहन खरेदी करू शकतात.
 
ज्या जातकांचा मूलांक किंवा भाग्यांक 9 आहे त्या जातकांनी लाल किंवा गुलाबी रंगाचे वाहन खरेदी करावे. हे रंग आपल्यासाठी शुभ ठरतील.