बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

Shani : शनीचे वेगवेगळे रूप

शनीचे रूप शनी हा कावेबाज, धूर्त, मन मानेल तसे वागणारा, आळशी, उद्योग न करणारा, स्वत:विषयी फाजील विश्वास असणारा, अहंकारी, आत्मप्रतिष्ठा  मिरवणारा, कलहप्रिय, कठोर भाषण करणारा, दुसर्‍याच्या मर्मी घाव घालणारा, असमाधानी, अविचारी, पैशाचा फार लोभी, काळा-सावळा, षड्विकारांनी यु्नत असतो, असे शनीचे वर्णन केलेले आहे.

शनीचे आजार : कोणकोणते आजार म्हणजे शनीची वक्रदृष्टी आहे ते पाहूया. थंडी-ताप, पडसे, बहिरेपणा, दात कुजणे, मलेरिया, पायोरिया, घटसर्प, पाठीच्या कण्याचा विकार, हाडांची अगर स्नायूंची लचक, हेमोराईडस्, दमा, फुफ्फुसाचा क्षय, र्नतन्यूनता, त्वचेचे रोग, कॅन्सर, पक्षघात वगैरे शनीचे आजार आहेत.

शनीचे कारकत्व : कोणकोणते व्यवसाय शनीच्या अधिपत्याखाली येतात?
मजूरवर्ग, शारीरिक काम करणारे, वृद्ध, शेतकरी, खाणी आणि खनिज पदार्थांचा व्यवसाय करणारे, नोकरवर्ग, पराधीन लोक, छापखान्यांचे मालक, कामगारवर्ग, नोकर-चाकर असे अनेक व्यवसाय शनीचे अधिपत्य दाखवतात. शनी दीर्घकालीन आजार, दारिद्य्र देतो. लोभ, मोह, अस्वस्थता, कैद, दंड, समाजात कमीपणा, उद्योगधंद्यात हानी देतो. शेतजमिनीशी संबंधित असणारे व्यवसाय, खाणी, कोळसा, शिसे, तुरुंग, खडतर कष्ट, साधे व हलके धंदे, मौनवृत्ती, स्मशानभूमी, जमीनदोस्त झालेली शहरे, गुप्त जागा, दर्‍या, जंगले, एकांत स्थाने, कोळशाच्या खाणी, विविध तर्‍हेची संकटे या सर्वांचा कारक शनी आहे. 
shani शनीची साडेसाती कोणत्या राशीला किती काळ अनिष्ट असते? 

1) मेष : ज्यांची मेष राशी असेल त्यांना मीन  राशीत शनी आल्याबरोबर साडेसाती सुरू होते. तेव्हा पहिली अडीच वर्षे व शेवटची अडीच वर्षे चांगली जातात. परंतु मेष राशीत शनी आला म्हणजे मधली अडीच वर्षे अनिष्ट जातात.

2) वृषभ : ज्यांची वृषभ राशी आहे त्यांना मेष राशीत शनी आला की साडेसाती पुन्हा सुरू होते व पहिलीच अडीच वर्षे अनिष्ट जातात. पुढील पाच वर्षे त्रासदायक जात नाहीत.

3) मिथुन : यांची मिथुन राशी आहे त्यांना वृषभ राशीत शनी आला की साडेसाती सुरू होते. पहिली पाच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.

4) कर्क : ज्यांची कर्क राशी आहे त्यांना शनी मिथुन राशीत आला की साडेसाती सुरू  होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.

5) सिंह : ज्यांची सिंह राशी आहे त्यांना शनी कर्क राशीत आला की  साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.

6) कन्या : ज्यांची कन्या राशी आहे त्यांना शनी  सिंह राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे त्रासदायक जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे चांगली जातात.

7) तूळ : ज्यांची तूळ राशी आहे त्यांना शनी कन्या राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.

8) वृश्चिक : ज्यांची वृश्चिक राशी आहे त्यांना शनी तूळ राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. मधली अडीच वर्षे त्रासदायक जातात.

9) धनू : ज्यांची धनू राशी आहे त्यांना शनी वृश्चिक राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे त्रासदायक जातात. शेवटची पाच वर्षे चांगली जातात.

10) मकर : ज्यांची मकर राशी आहे त्यांना शनी धनू राशीत आला की साडेसाती सुरू होते. संपूर्ण साडेसात वर्षे चांगली जातात.

11) कुंभ : ज्यांची कुंभ राशी आहे त्यांना शनी मकर राशीत आला की साडेसाती सुरू होते. संपूर्ण साडेसात वर्षे चांगली जातात.

12) मीन : ज्यांची मीन राशी आहे त्यांना शनी कुंभ राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली पाच वर्षे चांगली जातात. शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात. 

पुढे पहा शनीच्या अवस्था....  shani शनीच्या अवस्था :

1) बाल, 2) कुमार 3) तरुण 4) वृद्ध, 5) मृत, 6) जागृत 7) स्वप्नावस्था, 8) निद्रावस्था, 9) लज्जितावस्था 10) गर्भितवस्था 11) मुदितावस्था 12) क्षुधितावस्था 13) तृषार्तावस्था, 14) संशोभितावस्था. शनी वक्री झाल्यापासून मार्गी होण्यास 135 दिवस लागतात. कधी कधी 143 दिवस लागतात. शनी मार्गी झाल्यापासून वक्री होण्यास 232 ते 249 दिवस लागतात. 

शनीची चांगली फळे केव्हा मिळतात?

जन्मराशीपासून दुसरा, सहावा, दहावा, अकरावा शनी गोचरीने आला म्हणजे त्याची चांगली फळे अनुभवास येतात. विद्यार्थ्यांस परीक्षेत यश मिळते. उद्योगधंद्याची भरभराट होते. नोकरीत बढती मिळते. अधिकार मिळतात. पराक्रम आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. समाजात मानसन्मान मिळतो.
सगळ्या गोष्टी चांगल्या घडतात. घरात मंगलकार्ये घडतात.

तिसरा शनी आला म्हणजे द्रव्यलाभ होतो. वादविवादात यश मिळते. अशा शनीत काही गोष्टी अनिष्टही घडतात. उदाहरणार्थ पराक्रमाला चांगला असला तरी संततीविषयी त्रासदायक गोष्टी घडतात. द्रव्याचा खर्च फार होतो. आजारपणात काळ जातो. मनाला त्रासदायक गोष्टी अशाच वेळी घडतात.