शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अज्ञात चोरट्यांनी चक्क 300 लिटर पाणी चोरले

300 liter water
मनमाड शहराचा पाणी अत्यंत बिकट असून गेल्या चार दशकांपासून मनमाडकर तीव्र पाणी टंचाईचा सामना करतात. 
 
पालिकेकडून महिन्यातुन एकादाच पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा करतात. मनमाडच्या श्रावस्ती नगर भागात राहणाऱ्या विलास आहिरे यांनीही आपल्या घरावर पाचशे लिटरच्या पाण्याच्या टाक्या भरून ठेवल्या होत्या. 
 
त्यापैकी एका टाकीतून अज्ञात चोरट्यांनी चक्क 300 लिटर पाणी चोरून नेले आहे. त्यामुळे आहिरे यांच्या कुटुंबाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार दिली. आता पाणी चोरांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहेत. 

फोटो: सांकेतिक