1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 27 सप्टेंबर 2020 (20:29 IST)

संतापजनक : मानसिक रुग्ण युवतीवर दोघांचा अत्याचार

पुणे येथे संताप वाढवणारी घटना घडली आहे. यामध्ये मानसिक रुग्ण असलेल्या अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केले आहेत. वानवडी येथील १७ वर्षाच्या मानसिक रुग्ण युवतीचा गैरफायदा घेत, तिला प्रेमाचे आमिष दाखवून दोघांनी तिच्यावर अत्याचार केले़. ही मुलगी गर्भवती राहिल्यावर हा प्रकार उघड झाला आहे. या गंभीर प्रकरणी वानवडीपोलिसांनी एकाला अटक केली आहे़. प्रकाश किसनलाल आहीर (वय २०, रा़ दळवीनगर, बी़ टी़ कवडे रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे़ त्याचा साथीदार अनिल हाफसे (रा़ बारामती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. याप्रकरणी या मुलीच्या वडिलांनी पोलिसांना  फिर्याद दिली. फिर्यादी यांची १७ वर्षाची मुलगी मानसिक रुग्ण असून, या निष्पाप मुलीचा गैरफायदा घेऊन आहीर व हाफसे यांनी तिच्यावर २ नोव्हेबर २०१७ रोजी अत्याचार केला़ होता. त्यानंतर एप्रिल २०१८ ते ४ मे २०१९ या दरम्यान या दोघांनी तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला़. त्यातून ही युवती गर्भवती राहिली़ त्यानंतर हा प्रकार तिच्या पालकांच्या लक्षात आला़ आहे. या गंभीर प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली आहे.