मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 मे 2019 (17:24 IST)

पतीला मैत्रिणीसोबत पकडल्यानंतर पत्नी, सासू व सासऱ्याने केली धुलाई

husband
अहमदनगर जिल्ह्यात पतीला मैत्रिणीसोबत पकडल्यानंतर पत्नी, सासू व सासऱ्याने त्याची चांगलीच धुलाई केली आहे. ही घटना भिंगार येथील खळेवाडी परिसरात घडली. याप्रकरणी संबंधिताने पत्नी, सासू, सासऱ्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी पतीवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
 
याबाबत सविस्तर असे की, या घटनेतील पती पत्नी हे दोघेही भिंगारमध्ये राहतात. संबंधित महिलेचे माहेर कर्जत तालुक्यातील असून, घटनेच्या दिवशी पत्नी सासू व सासऱ्याने भिंगारला अचानक घरी आले.मात्र यावेळी आपला पती हा त्याच्या मैत्रिणीसोबत घरात असल्याचे पाहून संतापलेल्या पत्नीने त्याची चांगलीच धुलाई केली.तसेच सासू सासऱ्याने देखील तु ही मुलगी ठेवली आहे का. असे म्हणत त्याला शिवीगळ करून चांगलेच बदडून काढले.यावेळी त्याच्यासोबत असलेल्या मैत्रिणीला देखील मारहाण करण्यात आली आहे.संतापाच्या भरात सासऱ्याने जावयावर पाठीवर, छातीावर गळ्यावर चाकूने वार केल्याने तो जखमी झाला आहे. त्यामुळे त्याला खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. त्यानंतर त्याने स्वत:च पोलिसांत धाव घेत.भिंगार कॅम्प पोेलिसांत पत्नी, सासू, सासरे,आणि मेहूण्याविरूध्द फिर्याद दिली आहे.