बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

वरिष्ठाचा त्रास, महिला पोलीस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

उस्मानाबादमध्ये  सिटी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक यांनी वरिष्ठाच्या त्रासाला आणि स्थानिक पत्रकाराच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
 
मार्च महिन्यात उस्मानाबादच्या आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना त्याच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खाडे यांनी त्यांचा लैंगिक छळ केला होता. तशी महिला पोलिसाने २८ मार्च रोजी स्टेशन डायरीमध्ये नोंद केली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी याबाबत चौकशीसाठी वरिष्ठांची समिती नेमली होती. मात्र कारवाई न करता यांची उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनमध्ये बदली करण्यात आली होती.