1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. new dress code for convocation issue in Savitribai Phule Pune University

पदवीदान सोहळ्यात नवीन पोशाखाचा निषेध

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात नवीन पोशाखाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चक्क खेचराला पुणेरी पगडी घालून विद्यापीठात आणले होते. पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना प्रवेशद्वाराजवळच रोखले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीदान सोहळ्यात काळा घोळदार गाऊन आणि टोपी या ‘कॉन्व्होकेशन ड्रेस’ची जागा नवीन पोशाखाने घेतली.  यावेळी  कुडता, पायजमा,उपरणे आणि पगडी असा पोशाख होता. या समारंभाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खेचराला पुणेरी पगडी घालून विद्यापीठात आणले. पुणेरी पगडी नको फुले पगडी हवी, अशी मागणी त्यांनी केली.
पुढील लेख
मराठा आरक्षण कायद्याविरोधातील याचिकेवर सोमवारी सुनावणी