बेस्टचा संप कायम
मुंबईत बेस्टचा संप कायम आहे. महापौर बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत चाललेली बैठक निष्फळ ठरली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह बेस्ट कर्मचारी संयुक्त कृती समितीचे सदस्य, मुंबई महापालिका आयुक्त, महाव्यवस्थापक, महापौरांसह पालिकेतील पदाधिकारी यांच्यात ही बैठक झाली. मात्र, या बैठकीत कोणताही तोडगा न निघता बैठक निष्फळ ठरली.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने संपावर कोणताही तोडगा निघालेला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने कर्मचारी संघटनांच्या मागण्यांबाबत बेस्ट प्रशासन, महापालिका आयुक्त अजय मेहता आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यात रात्री उशिरापर्यंत महापौर निवासस्थानी बैठक झाली. मात्र, काहीही तोडगा निघाला नाही. त्यामुळे ही चर्चा फुकट गेली आहे.