शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जून 2020 (09:58 IST)

केरळमध्ये हत्तीणीचा मृत्यू: दोषींची माहिती देणाऱ्यांना 50 हजारांचं बक्षिस

प्राण्यांसाठी काम करणाऱ्या ह्यूमन सोसायटी इंटनॅशनल/इंडियाने (HSI) केरळमध्ये हत्तीणीचा दुर्देवी मृत्यूच्या घटनेसाठी दोषी असणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला 50 हजार रुपये बक्षिस देण्याची घोषणा केली आहे.
 
केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीचा फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिल्यामुळे मृत्यू झाल्याची बातमी कळल्यानंतर सोशल मीडियावर भावानांचा तूफान बघायला मिळत आहे. लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. या घटनेनंतर केरळ वन-विभागाने हत्तीणीच्या मारेकऱ्यांचा शोध सुरु केला आहे. 
 
केरळमधील वन-विभागात काम करणारे अधिकारी मोहन क्रिश्नन यांच्या फेसबुक पोस्टमुळे ही घटना प्रसारमाध्यमांसमोर आली. मल्लपुरम जिल्ह्यातील एका गावात फटाक्यांनी भरलेलं अननस गर्भवती हत्तीणीला खायला देण्यात आलं. ते खाल्ल्यानंतर हत्तीणीला आपले प्राण गमवावे लागले. हे फळ खाल्ल्यानंतर ते तिच्या पोटात फुटलं. यात हत्तीणीची जीभ आणि तोंडाला चांगलीच दुखापत झाली होती. या वेदनामुळे तिला काही खाता देखील येतं नव्हतं. नंतर ही हत्तीण वेलियार नदीच्या किनारी पोहचली आणि ती पाण्यात जाऊन उभी राहिली. 
 
या हत्तीणीला बाहेर काढण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी इतर दोन हत्तींना घटनास्थळावर आणलं, पण काही उपयोग झाला नाही. हत्तीणीला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले परंतू अखेरीस तिने आपले प्राण सोडले.
 
इकडे HSI प्रमाणे या घटनेसाठी जबाबदार दोषींची माहीत पुरवणार्‍याला प्रोत्साहित केले जाईल. तसेच माहीती देणार्‍यालाच्या इच्छेप्रमाणे त्याचे नाव गुपित ठेवण्यात येईल. त्यांनी म्हटले की आमचा उद्देश्य दोषींना दंड देणे आहे ज्याने समाजात अशा प्रकारे कृत्य करण्याची हिंमत होत कामा नये. संस्थेने यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांक 7674922044 वर माहीती देता येईल असे सांगितले आहे.