गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 3 जून 2020 (16:02 IST)

युवीने विकत घेतले 64 कोटींचे महागडे घर

भारताला दोन वर्ल्डकप जिंकून देणारा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आता भारतीसंघाचा कर्णधार विराट कोहलीचा शेजारी होणार आहे. युवराजने नुकतेच विराटच्या बिल्डिंगमध्ये घर घेतले आहे. वरळीतील प्रसिद्ध ओमकार 1973 टॉवरमध्ये युवी लवकरच पत्नीसह शिफ्ट होणार आहे. मात्र या घराची किंमत ऐकून कोणाचेही डोळे मोठे होतील कारण त्याने 64 कोटी रूपयांना हे घर घेतले आहे.
 
विराटने 2016 मध्ये ओमकार टॉवर्समध्यये घर घेतले. त्याचे घर 35 व माळ्यावर आहे तर, युवीने 29व्या माळ्यावर हे घर घेतले आहे. युवीचे घर तब्बल 16 हजार स्क्वेअर फूट एवढे आहे. 64 कोटी इतकी महागडी किंमत असल्याने याचा याचा अर्थ युवराजने प्रतिस्क्वेअर फूट 40 हजार रुपये दिले आहेत. विराटने ओकार अपार्टमेंटमध्ये हे घर 34 कोटींना विकत घेतले होते. टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माही मुंबईच्या वरळी भागात राहतो. रोहितने 2017 मध्ये सीफेसिंग घर घेतले होते. त्याचा फ्लॅट 6 हजार स्क्वेअर फूट आहे. रोहितच्या घरातून अरबी समुद्राचे दृश्य दिसते.
 
सध्याच्या भारतीय खेळाडूंबाबत बोलायचे झाल्यास विराट कोहली आणि रोहित शर्मा सर्वात महागड्या घरात राहतात. मात्र आता युवीने या दोघांना मागे टाकले आहे. असे म्हटले जात आहे की, या वर्षाअखेरीस युवराजसिंग त्याची पत्नी हेजलसह वरळीतील आपल्या आलिशान अपार्टमेंटमध्ये राहायला जातील.