गुरूवार, 9 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 ऑक्टोबर 2025 (18:36 IST)

रमी व्हिडिओ वाद प्रकरणात रोहित पवारांनी माफी मागण्याची माणिकराव कोकाटे यांची मागणी

Rummy video controversy
क्रीडा मंत्री माणिक कोकाटे यांनी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात आमदार रोहित पवार यांनी रमी व्हिडीओ प्रकरणात माफी मागण्याची मागणी केली आहे. 
हे प्रकरण पावसाळी अधिवेशनादरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या "मंत्र्याचा रमी खेळण्यावरून संबंधित खटल्याचा आहे. मंत्री कोकाटे यांचा दावा आहे की हा व्हिडिओ एडिटेड आहे आणि त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कोकाटे यांनी न्यायालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांनी विधान परिषदेत कधीही मोबाईल फोनवरून रमी खेळलो नाही. त्या व्हायरल व्हिडीओमुळे त्यांची प्रतिष्ठा खराब झाली असून रोहित पवारांनी व्हिडीओ व्हायरल केल्याबद्दल जाहीरपणे माफी मागावी. अशी मागणी केली आहे. 
 
कोकाटे यांचे वकिलांनी न्यायालयात सांगितले की, पवार यांना नोटीस बजावून देखील त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. विधानपरिषदेचे सदस्य नसताना देखील रोहित पवार यांनी व्हिडीओ कसा बनवला आणि त्यांच्याकडे व्हिडीओ कसा आला हा प्रश्न न्यायालयात उपस्थित केला. कोकाटे म्हणाले, विधानपरिषदेत मोबाइलफोन वापरण्यास मनाई असून देखील हा व्हिडीओ बेकायदेशीर कसा तयार करण्यात आला.
मंत्री कोकाटे म्हणतात की त्यांना न्याय आणि प्रतिष्ठेचे संरक्षण दोन्ही आवश्यक आहे. त्यांचे ध्येय केवळ त्यांच्या वैयक्तिक सन्मानाचेच नाही तर लोकशाही संस्था आणि सार्वजनिक विश्वासाचे देखील रक्षण करणे आहे.या प्रकरणाची पुन्हा सुनावणी गुरुवार, 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 
Edited By - Priya Dixit  
 
Minister Kokate, Rohit Pawar, Rummy video controversy, apology demanded for Rummy video