1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified सोमवार, 22 जून 2020 (16:16 IST)

सुशांत माझ्या पोटी पुनर्जन्म घेणार, राखी सावंतने व्हिडीओमध्ये सांगितलं

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्या आत्महत्येमुळे एका बाजूला घराणेशाहीवरुन वाद सुरु आहे तर दुसरीकडे राखी सावंतने सुशांतबद्दल आलेलं स्वप्न सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राखी यामुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाली आहे.
 
राखी सावंतने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ‍ती सांगत आहे की मला सुशांत सिंह राजपूत स्वप्नात दिसला. त्यांनी म्हटलं की माझ्या चाहत्यांना सांग की मी पुन्हा जन्म घेणार. राखीने सुशांत माझ्या पोटी जन्म घेणार असे म्हणून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
 
तू लग्न कर त्यानंतर मी तुझ्या पोटी जन्म घेईन असं सुशांतने सांगितल्याचं, राखीने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. ती म्हणाली की मला पहाटे चार वाजता हे स्वप्न पडलं आणि म्हणतात की पहाटे पडलेले स्वप्न नक्की पूर्ण होतात. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

राखीचा हा व्हिडीओ व्हायरल होत असला तरी अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.