1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 22 जून 2020 (13:18 IST)

ट्विटरवर #BoycottKhans ट्रेंड टॉपमध्ये

#BoycottKhans in top trend on twitter
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडच्या अनके मोठमोठाल्या कलाकर आणि निर्मात्यांवर सोशल मीडियाच्या माध्यामातून ‍निशाणा साधला जात आहे. 
 
यामुळे घराणेशाहीवरून सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. सलमान खान आणि करण जोहर यांना या प्रकरणाचे जबाबदार ठरवले जात आहे. अशात ट्विटरवर #BoycottKhans हा हॅशटॅग टॉप ट्रेंडिंगमध्ये असल्याचे दिसून येत आहे. 
 
सुशांतचे चाहते यासाठी सलमान खानला जबाबदार ठरवत असून त्याला बॉयकॉट करण्याची मागणी करत आहे. सलमानचे चाहते मात्र त्याला पाठिंबा देत आहे अशात सलमानने देखील स्वत:च्या चाहत्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला असून ही वेळ वाद घालण्याची नव्हे तर सुशांतच्या चाहत्यांची भावना समजून घेण्याची असल्याचे तो म्हणाला. 
 
दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येनंतर करण जोहर आणि सलमान खान या दोघांविरोधात एक ऑनलाईन पिटिशन देखील सुरु करण्यात आली आहे.