शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 17 जून 2020 (16:20 IST)

करण जोहर, भन्साळी, सलमान खान आणि एकता यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी बॉलिवूडमधील निर्माते-दिग्दर्शक करण जोहर, संजय लीला भन्साळी, अभिनेता सलमान खान आणि निर्माती एकता कपूर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुशांतला ७ चित्रपटांमधून काढून टाकले गेले होते आणि त्यामुळेच त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. वेगवेगळ्या चित्रपटांच्या निर्मितीची जबाबदारी करण जोहर, संजय लीला भन्साळी, सलमान खान आणि एकता कपूर यांच्याकडे होती.
 
सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगना राणावत, विवेक ओबेरॉय, अभिनव कश्यप, अनुभव सिंह यांच्यासह सर्वसामान्य चाहत्यांनीही ट्विटरवर करण जोहर, सलमान खान यांच्याविरोधात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टीकेची झोड उठवली होती. दरम्यान, सुशांतच्या दोन्ही माजी मॅनेजरचे जबाब पोलिसांकडून घेण्यात आले आत. दोन्ही मॅनेजर ऑक्टोबर १९ ते जानेवारी २० या कालावधीत सोबत नव्हते. सुशांतने त्यांना जायला सांगितलं होतं. सुशांतकडे फारसे काम नसल्यामुळे त्याने जायला सांगितलं होतं. पुन्हा फेब्रुवारी-मार्चमध्ये भेटू असं तो म्हणाला होता. कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांचा जबाबही पोलीस घेत आहेत.