गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 11 मे 2020 (12:21 IST)

सलमानसोबत काम करण्यास शाहरुखचा नकार

सध्या बॉलीवूड बादशाह शाहरुख खान कोणता चित्रपट करत असतानाचे दिसून येत नाहीये. झिरो या चित्रपटानंतर त्याचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. तसेच नवीन चित्रपटाबद्दल त्याने कुठलीही घोषणा केलेली नाही. दरम्यान त्याने सलमानसोबत काम करण्यास नकार दिल्याची बातमी येत आहे.
 
राजकुमार हिरानी यांच्या आगामी बिग बजेट चित्रपटात त्यांना दोन नायकांची गरज असून यासाठी त्यांनी शाहरुख आणि सलमानची निवड केली होती मात्र शाहरुखला स्क्रीन शेअर करायची नसल्याची बातमी असल्यामुळे हिरानी दुसर्‍या नायकाच्या शोधत असल्याचे सांगितले जात आहे. 
 
सूत्रांप्रमाणे शाहरुखने सलमानसोबत स्क्रीन शेअर करण्यास साफ नकार दिल्याचं कळतंय. शाहरुनने बिग बजेट चित्रपटाकडे पाठ फिरवल्यावर तो कोणत्या चित्रपटासाठी वाट बघतोय याबद्दल आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. शाहरुख कोणताही निर्णय‍ विचारपूर्वक घेणार असल्याचीही चर्चा आहे कारण मागील काही वर्षात त्याच्या सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले आहेत.