बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 10 मे 2020 (10:28 IST)

गुगल आणि फेसबुकच्या कर्मचाऱ्यांना डिसेंबरपर्यंत 'वर्क फ्रॉम होम' ची परवानगी

गुगल आणि फेसबुक कंपनीने कर्मचाऱ्यांना डिसेंबरपर्यंत 'वर्क फ्रॉम होम' करण्याची परवानगी दिली आहे. गुगलने १ जून पर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्याची सुविधा दिली होती पण आता कंपनीने 'वर्क फ्रॉम होम'चा कालावधी डिसेंबरपर्यंत वाढवला आहे. 
 
फेसबुकने देखील ६ जून रोजी ऑफिस पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला होता परंतु परिस्थिती पाहता आता फेसबुकने देखील 'वर्क फ्रॉम होम'चा कालावधी डिसेंबरपर्यंत वाढवला आहे.  
 
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी काही दिवसांपूर्वी गुगलच्या कर्मचाऱ्यांना एक ई-मेल केला होता. या मेलमध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन करत सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसात येण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे.