शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 27 एप्रिल 2020 (22:04 IST)

JioMart ही सेवा WhatsApp द्वारे सुरू करणार

जिओ फेसबुकचा हात धरत JioMart ही सेवा  WhatsApp द्वारे सुरू करणार आहे. रिलायन्सने आपले ऑनलाइन इ-कॉमर्स पोर्टल JioMart ची सुरूवात केली आहे. JioMart ही रिलायन्सची आणि WhatsApp फेसबुकच्या मालकीची कंपनी आहे. या कारणास्तव, दोन्ही कंपन्यांनी व्यवसायात भागीदारी करार देखील केला आहे. लॉकडाऊनच्या काळात याचा फायदा  आता ग्रहकांना घेता येणार आहे.
 
JioMart कडून ८८५०००८००० हा WhatsApp नंबर देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. या नंबरच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या किराणा आणि ग्रॉसरीचं सामान मागवता येणार नाही. सध्या ही सेवा काही शहरांमध्ये लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण, त्याचप्रमाणे मुंबईच्या काही भागांमध्ये देखील ही सेवा सुरू करण्यात आली आहे. 
 
या नंबरवर ‘Hi’ असा मेसेज पाठवल्यानंतर ग्राहकांना ऑर्डरसाठी जिओमार्टद्वारे एक लिंक मिळते. ही लिंक ३० मिनिटांसाठी वैध असते. सामान ऑर्डर केल्यानंतर तुमच्या सामानाची यादी दुकानासोबत शेअर करेल. यानंतर ग्राहकांना ऑर्डरबाबत नोटिफिकेशन आणि दुकानाबाबतची सर्व माहिती मिळते.