Jio चा नवीन वर्क फ्रॉम होम प्लान, फायद्याचा ठरेल
देशाची वर्तमान परिस्थिती बघता रिलायन्स जिओने पुन्हा एकदा आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी ‘NEW WORK FROM HOME PLANS’ लॉन्च केले आहेत. सध्या जास्त डेटा असणाऱ्या प्लॅन्सची मागणी वाढली आहे त्यामुळे ग्राहकांसाठी जिओने अधिक डेटा देणारं प्लान लॉन्च केले आहे.
जाणून घ्या Jio च्या नवीन वर्क फ्रॉम होम प्लानबद्दल
रिलायन्स जिओने 365 दिवस अर्थात एका वर्षाची व्हॅलिडिटी असलेला 2,399 रुपयांचा एक प्लान लॉन्च केला आहे. यात ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळेल. तसेच, अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसचाही फायदा मिळेल. वर्क फ्रॉम होम आणि अधिक डेटा वापरणाऱ्यांसाठी हा प्लान योग्य ठरु शकतो तसेच प्रतिस्पर्धी कंपन्यांकडे असलेल्या वार्षिक प्लॅनच्या तुलनेत या प्लॅनमध्ये 33 टक्के अधिक फायदा मिळतो, असा दावा कपंनी करतं आहे.
शिवाय कंपनी आधीपासूनच 336 दिवसांच्या वैधतेसह 2,121 रुपयांचा एक वार्षिक प्लान ग्राहकांना देत आहे ज्यात दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो.
याशिवाय कंपनीने 151, 201 आणि 251 रुपयांचे तीन डेटा अॅड ऑन पॅक आणले आहेत. या तिन्ही प्लॅनमध्ये अनुक्रमे 30 जीबी, 40 जीबी आणि 50 जीबी डेटा मिळतो. विशेष म्हणजे हे प्लान डेटा ओन्ली असल्यामुळे यात व्हॅलिडिटीचा प्रश्न उद्धभवतच नाही.