बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 25 एप्रिल 2020 (20:59 IST)

वाचा, डबल डेटा ऑफरचे काही नवीन प्लॅन

व्होडाफोन-आयडियाने डबल डेटा ऑफरचे काही नवीन प्लॅन सुरू केले. यात २९९ रुपये, ४४९ रुपये आणि ६९९ रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. यात रोज २ जीबी डेटा मिळतो. परंतु यात डबल डेटा लागू केल्यावर रोज ४ जीबी डेटा मिळतो. मात्र, कंपनीकडे याआधीही दोन प्लॅन आहेत, यात डबल डेटा ऑफर मिळतो. व्होडाफोन-आयडियाच्या या तिन्ही प्लॅनचा कालावधी क्रमशः २८ दिवस, ५६ दिवस आणि ८४ दिवस असा आहे.
 
ही योजना सध्या मर्यादित संख्येच्या सर्कलमध्ये उपलब्ध आहेत. व्होडाफोन-आयडियाचे डबल डेटा ऑफर प्लॅन दिल्ली, मध्य प्रदेश, मुंबई, कोलकाता, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, राजस्थान आणि जम्मू-काश्मीर येथे उपलब्ध आहे. तसेच ६९९ रुपयांचा प्लॅन आंध्र प्रदेश आणि तेलंगानामध्ये ही उपलब्ध आहे. सर्व प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि व्होडाफोन प्ले सब्सक्रिप्शन व ऑफर्स मिळणार आहेत.