सौंदर्य टिप्स : घरच्या घरी फेशियल करा
चेहऱ्याचे सौंदर्य टिकून राहावेसे सर्वांनाच वाटते. ह्यासाठी चेहऱ्याचे सौंदर्य टिकविण्यासाठी वेळो वेळी फेशियल करणे गरजेचे असते. पण सध्याच्या काळात पार्लरमध्ये जाऊन फेशियल कसे करावे हा एक मोठा प्रश्नच आहे. पण काळजी नसावी... आपण घरात राहून सुद्धा फेशियल करू शकता. तर जाणून घ्या यासाठी काय करावे तेसर्वप्रथम आपले केस आपण व्यवस्थितरीत्या बांधून घ्यावे. जेणे करून ते फेशियल करताना आपल्या चेहऱ्यावर येऊ नये.
चेहऱ्याला स्वच्छ धुवून घ्यावे. त्यासाठी आपण फेसवॉश किंवा साबण देखील वापरु शकता.
नंतर कच्च्या दुधाने आपला चेहरा स्वच्छ सूती कपड्याच्या मदतीने पुसून घ्यावा.
स्क्रब करण्यासाठी तांदुळाचे पीठ घेऊन त्यामध्ये दही आणि लिंबाचे रस टाकावे.
ह्या पेस्टला आपल्या चेहऱ्यावर चोळावे.
आता चेहऱ्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
1 वाटीत 2 चमचे दूध आणि 1 चमचा मध घेऊन त्याला आपल्या चेहऱ्यावर मळावे.
नंतर चेहऱ्याला सूती कापड्याने पुसून घ्यावे किंवा पाण्याने चेहऱ्याला स्वच्छ धुवू शकता.
चेहऱ्याला स्वच्छ टॉवेलने पुसून घ्यावे.
आता चेहऱ्याला स्टीम (वाफ) द्यावी :
या साठी पाणी गरम करून घ्यावं. स्वत:च्या डोक्यावर टॉवेल टाकून गरम पाण्याच्या भांड्यावर चेहरा ठेवून वाफ घ्यावी. चेहरा आणि पाण्यात योग्य अंतर ठेवावं नाहीतर अधिक प्रमाणात गरम वाफा चेहरा जाळू शकतात. अशात मधून चेहरा वर करत राहावा.
शेवटी आपल्या चेहऱ्यावर फेसपॅक लावावे.
फेसपॅक बनविण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती
1 चमचा डाळीचे पीठ, 1 चमचा गव्हाचे पीठ, लिंबाचा रस, आणि टॉमेटोचे रस घेऊन सर्व एकजीव करावे, आणि आता ह्या पेस्टला चेहऱ्यावर आणि मानेवर लावावे. कोरडे झाल्यावर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.