शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 21 एप्रिल 2020 (09:29 IST)

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल तर केसांच्या छटेपेक्षा वेगळी छटा निवडा; परंतु तो तुम्हाला शोभेल याची खात्री करून घ्या. चांगल्या शॅम्पूने केस धुवा, मात्र कंडिशनर लावू नका. 

कंडिशनरमुळे रंग नीट बसत नाही. धुतलेले केस विंचरण्यासाठी कायम मोठ्या दातांचा कंगवा वापरा म्हणजे केस जास्त तुटणार नाहीत. केस वाळवण्यासाठी ते टॉवेलने जोरजोरात पुसू नका, म्हणजे ते तुटणार नाहीत. त्याऐवजी डोक्याला टॉवेल गुंडाळून केसांमधील पाणी टॉवेलने टिपून घ्या. केस वाळवण्यासाठी ड्रायरचा वापर करू नका. 

ओल्या केसांना रंग लावू नका. रंग लावताना हातात मोजे घाला. कपाळावर, कानांवर, मानेवर रंगाचे डाग पडू नयेत म्हणून व्हॅसलीन वा खोबरेल तेल लावा. रंग लावलेले केस लिंबाचा रस घातलेल्या पाण्याने धुवा, जेणेकरून रंग दीर्घकाळ टिकेल. 

रंग लावल्यावर केसांमधील आर्द्रतेचं प्रमाण कमी होतं व केस कोरडे होतात. त्यामुळे केस धुण्यासाठी रंग लावलेल्या केसांसाठी खास असं नमूद केलेला शाम्पू आणि कंडिशनरच वापरा. केसांची वाढ झाल्यावर केसांच्या मुळाशी त्यांचा नैसर्गिक रंग दिसू लागतो. अशा वेळी केसांना टचअप करायला विसरू नका. टचअप करताना केस मुळाशी आधी रंगवा, 15 मिनिटांनंतर बाकीच्या केसांना रंग लावा.