मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified शनिवार, 9 मे 2020 (19:01 IST)

राज्य त्यांच्या कामगारांना परत घ्यायला तयार नाही, केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा - बाळासाहेब थोरात

टाळेबंदीमुळे राज्यात अडकलेल्या कामगारांना परत घ्यायला अनेक राज्य तयार नसल्याबद्दल राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेक राज्यांनी स्थलांतरित कामगारांबद्दल मनमानी निर्णय घेतल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.

स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असताना अनेक राज्यं त्यांच्या कामगारांना परत घेत नसल्याचं त्यांनी सांगितलं. या संदर्भात केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. राज्यात सुमारे दहा लाख स्थलांतरित कामगार असून त्यांना परत आपल्या राज्यात परतायचं आहे. राज्यातून बत्तीस रेल्वे कामगारांना त्यांच्या राज्यांमधे जाण्यासाठी सोडण्यात आल्या असल्याची माहितीही महसूलमंत्री थोरात यांनी दिली आहे.