गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 9 मे 2020 (15:35 IST)

घराबाहेर पडल्यास त्यांची थेट विगलीकरण कक्षात रवानगी

प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी घराबाहेर पडल्यास त्यांची रवानगी थेट विगलीकरण कक्षात केली जाईल, असा इशारा नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. याशिवाय नागरिकांनी पोलिसांशी हुज्जत घातल्यास कठोर कारवाई केली जाईल, असं तुकाराम मुंढे म्हणाले आहेत 
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पोलिसांना आणखी कठोर कारवाई करण्याची सूचना केली. नागपुरात पुढचे 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील कुठलीही व्यक्ती घराबाहेर पडणार नाही असा पोलीस बंदोबस्त करा, असं आवाहन मुंढेंनी केलं. याशिवाय नागरिकांनीदेखील सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.