मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 28 एप्रिल 2020 (16:24 IST)

50 वर्षांपुढील पोलीस कर्मचाऱ्यांना सुट्टी, घरीच थांबण्याच्या सूचना

करोना विषाणूमुळे मुंबईत तीन कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे तसेच पुणे शहरात या विषाणूचे 8 रुग्ण पोलीस विभागात आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची विशेष काळजी घेतली जात असून एक निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत पोलीस आयुंक्तांनी ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याच्या सूचना‍ दिल्या आहेत तसेच ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचे वय ५२ पेक्षा अधिक आहे आणि त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजार आहेत, अशांनाही घरीच राहण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.
 
इकडे पुण्यात आठवड्याभरापूर्वीच 50 वर्षांपुढील पोलीस कर्मचार्‍यांना फिल्डवरील डय़ुटी देणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्यांना मधुमेह, गर्भवती महिला आणि अगदी लहान मुले असलेल्यांना देखील फिल्डवरील ड्युटी दिली जाणार नाही. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना गंभीर आजार आहेत, अशा कर्मचारी वर्गाला रजेवर पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचे वय ५२ पेक्षा अधिक आहे आणि त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजार आहेत, अशांनाही घरीच राहण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.
 
३ मे पर्यंत सर्व पोलीस ठाण्यांतील कर्मचारी १२ तास ड्युटीवर असतील. उपनगरांतील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये आधीपासूनच अशा प्रकारे यंत्रणा कार्यरत आहे.