रोहित शेट्टीने केली आहे 'अशी' मदत
मुंबई पोलिसांच्या मदतीला दिग्दर्शक रोहित शेट्टी धावून आला आहे. करोना व्हायरसशी लढण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या ऑन-ड्युटी पोलिसांसाठी रोहित शेट्टीने शहरातील आठ हॉटेल्सची व्यवस्था केली आहे. त्याच्या या मदतीसाठी मुंबई पोलिसांनी ट्विट करत त्याचे आभार मानले आहेत.
या हॉटेल्समध्ये ऑन-ड्युटी पोलिसांना थोडा वेळ आराम करता येणार आहे. अंघोळ किंवा कपडे बदलण्यासाठीही हे हॉटेल्स सोयीस्कर ठरतील. तेथे त्यांना नाश्ता व जेवणसुद्धा देण्यात येणार आहे. करोना व्हायरसशी लढण्यात आणि मुंबईला सुरक्षित ठेवण्यात आम्हाला साथ दिल्याबद्दल धन्यवाद, असं म्हणत मुंबई पोलिसांनी त्याचे आभार मानले आहेत. रोहित शेट्टीच्या या कामाचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.