सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 9 एप्रिल 2020 (16:32 IST)

अजय देवगणने काय म्हणतो, वाचा

अभिनेता अजय देवगणने पोलिसांसोबत रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली आहे. अजय देवगणने तसं ट्विटच केलं आहे. अजय देवगणने ट्विट करत म्हटलं आहे की, “प्रिय मुंबई पोलीस…तुम्ही जगातील सर्वोत्तम असणाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जाता. करोनाशी लढा देताना तुम्ही दिलेलं योगदान अतुलनीय आहे. तुम्ही जेव्हा कधी सांगाल तेव्हा हा सिंघम खाकी घालून तुमच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरण्यास तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र”.
Dear Mumbai Police, you are known as one of the BEST in the world. Your contribution to the COVID-19 pandemic is unparalleled. Singham will wear his Khakee and stand beside you whenever you ask. Jai Hind, Jai Maharashtra@CPMumbaiPolice @MumbaiPolice
— Ajay Devgn (@ajaydevgn) April 9, 2020
अजय देवगणकडून पीएम केअर फंडसाठी २५ कोटी ५१ लाख तर महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच कोटींची आर्थिक मदत दिली आहे. याशिवाय अजय देवगणकडून फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉइजला ५१ लाखांची मदत देण्यात आली आली.