सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 मे 2020 (15:31 IST)

वाघांनो, असं रडू नका. साहेबांचे आशीर्वाद आहेत

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळालेली नाही. त्यावर पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पक्षाच्या या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नाही. उमेदवारी मिळालेल्या चौघांनाही माझे आशीर्वाद आहेत,’ असे सूचक ट्विट पंकजा यांनी केले आहे.
 
‘पक्षानं उमेदवार यादी जाहीर केल्यापासून दिवसभर फोन येते होते. कार्यकर्ते दु:ख व्यक्त करत होते. पण मी फोन उचलला नाही. कुणाकुणाला उत्तर देऊ. वाघांनो, असं रडू नका. मी आहे ना! तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही… साहेबांचे आशीर्वाद आहेत,’ असे कार्यकर्त्यांना धीर देताना त्यांनी म्हटले आहे.