मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 मे 2020 (12:54 IST)

शाहरुख खान व त्याच्या टीमने अम्फान पीडितांसाठी ट्विटरवर मदत पॅकेज जाहीर केले

पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये चक्रीवादळ अम्फानने मोठ्या प्रमाणात विनाश केले. दोन्ही राज्यात शेकडो झाडे उखडली गेली आणि बर्‍याच भिंती पडल्या. बंगालमध्ये वादळाच्या कहरात 72 जणांचा मृत्यू झाला आहे. या विनाशाने हैराण झालेल्या बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान मदतीसाठी आला आहे. त्याचा संघ कोलकाता नाइट रायडर्सने ट्विटरवरून मदत पॅकेज जाहीर केले आहे.