रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 25 मे 2020 (10:16 IST)

शाहरुख खानवर दोन मराठी लेखकांनी केला स्क्रिप्ट चोरीचा

शाहरुख खानच्या रेड चिलीज एण्टरटेनमेन्ट कंपनीने 'बेताल' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित केला. पण आता ही सीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे कारण दोन मराठी लेखकांनी कंपनीवर कथा चोरल्याचा आरोप केला आहे.
 
शाहरुखच्या रेड चिलीज एण्टरटेनमेन्टने या सीरिजची निर्मिती केली. मराठी लेखक समीर वाडेकर आणि मेहश गोसावी यांनी बेताल सीरिजची स्क्रिप्ट चोरल्याचा आरोप केला आहे. 
 
लेखकांच्या मते त्यांनी त्यांचं स्क्रिप्ट स्क्रीन रायटर्स असोसिएशनमध्ये वर्षभरापूर्वीच रजिस्टर केलं आहे. त्यांनी असोसिएशनकडे स्क्रिप्ट चोरल्याची तक्रारही केली आहे. लेखकांप्रमाणे ही कथा घेऊन ते अनेक निर्मात्यांकडे गेले होते परंतू रेड चिलीज एण्टरटेनमेन्टसोबत कोणतीही चर्चा झाली नव्हती. सध्या उच्च न्यायालयात हा वाद गेला आहे. रजिस्टर केल्याचे काही महिन्यांनंतर जुलै २०१९ मध्ये 'बेताल' सीरिजचं चित्रीकरण सुरू झालं.
 
लेखकांच्या मते, केवळ कथा नव्हे तर काही सीन्स देखील चोरी केले गेले आहे. हा वाद कोर्टात असला तरी सध्या सीरिवर स्टे लावण्यात आलेले नाही. तसेच शाहरूख खानच्या कंपनीकडून यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
 
शाहरुखने काही‍ दिवसांपूर्वीच नेटफिलिक्ससोबत काम करणे सुरू केले असून त्यांच्या बॅनर अंतर्गत 'बार्ड ऑफ ब्लड' रिलीज झाली होती ज्याला काही विशेष प्रतिसाद मिळाला नव्हता परंतू बेतालला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.