बुधवार, 10 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 मे 2020 (22:01 IST)

नेटफ्लिक्स वर अनुराग कश्यपचा ‘चोक्ड’

Choked Trailer
दिग्दर्शक अनुराग कश्यपचा ‘चोक्ड’ नावाचा  नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘नेटफ्लिक्स’ च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सवर प्रदरशित होणारा अनुरागचा हा दुसरा चित्रपट आहे. या आधी अनुरागची ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. ‘चोक्ड’ची कथा नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर आधारीत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून यात अमृता सुभाष, उपेंद्र लिमये यांसारख्या मराठी कलाकारांची बघायला मिळत आहेत.
 
सैय्यामी खेर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील काम करणाऱ्या महिलेची भूमिका ती साकारत आहे. अचानक एके दिवशी तिला किचनच्या पाइपमधून प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लपवलेल्या नोटांचं बंडल मिळतं. या पैशांमुळे तिचं आणि तिच्या कुटुंबीयांचं आयुष्य थोडंफार सुधारतं. मात्र तेव्हाच नोटाबंदीची घोषणा होते. यानंतर तिला सापडलेल्या पैशांचं काय होतं,  याची उत्सुकता हा ट्रेलर बघितल्यावर निर्माण होते.