'पाताल लोक'चा उत्सुकता वाढवणार टीजर रिलीज
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची पाताल लोक ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून ही सीरिज प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर पुढील महिन्यात १५ मेपासून पाहता येणार आहे. क्लीन स्लेट फिल्म्स निर्मित या वेबसीरिजची अभिनेत्री अनुष्का शर्मा ही निर्माती असून या निमित्ताने तिने वेबसीरिजच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. प्रदर्शित झालेल्या टीजरमध्ये एका शांत जगाची सफर प्रेक्षकांना घडवण्यात आली आहे.
रहस्य, ड्रामा, थरार याचा अनुभव पाताल लोकचा टीजर पाहून येतो. स्वर्ग लोक, पाताल लोक आणि पृथ्वी लोक अशा प्राचीन क्षेत्रांचा प्रवास या वेबसीरिजमध्ये घडवला जात आहे. टीजर पाहिल्यानंतर ही सीरिज पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.