शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 एप्रिल 2020 (21:53 IST)

आईने वाढदिवसाला सचिनला दिला हा खास फोटो

मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा आज ४७ वा वाढदिवस असून देशात लॉकडाऊन असल्यामुळे सचिनने वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले होते. सर्वांनी आपल्या लाडक्या सचिनला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. पण त्याला या दिवशी एक खास भेट मिळाली ती त्याच्या आईकडून. 
 
सचिनने एक ट्विट पोस्ट केली आहे. या ट्विटमध्ये त्यांने वाढदिवसाला आईच्या पाया पडून आशीर्वाद घेतानाचा फोटो पोस्ट केला आहे तर दुसर्‍या फोटोत त्याच्या आईने त्याला एक फोटो दिला आहे. सचिनच्या आईने वाढदिवसाला त्याला गणपतीचा फोटो दिला.
 
आजच्या दिवशाची सुरुवात आईचे आशीर्वाद घेऊन आणि तिने भेट म्हणून गणपती बाप्पाचा फोटो मिळाल्याने झाली. ही भेट माझ्यासाठी अमुल्य असल्याचे सचिनने म्हटले आहे.