सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 20 एप्रिल 2020 (14:16 IST)

‘स्क्वेअर कट’ टू ‘हेअरकट’, सचिन तेंडुलकरने स्वत: चालवली कात्री, लूक व्हायरल

करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशात लॉकडाउन आहे. अशा स्थितीत केवळ जीवनावश्यक वस्तू आणि वैद्यकीय सेवा पुरवणारी दुकाने चालू असून इतर सर्व बंद असल्याने सर्व गोंधळलेले आहेत. अशात सर्वांचे लाडके मास्टरब्लास्टर अर्थातच क्रिकेटच्या देवालादेखील घरच्या घरीच केस कापण्याची वेळ आली आहे. 
 
सचिन तेंडुलकरने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. यात सचिन हातात कात्रीने केस सेट करत असताना दिसत आहे. तर पुढील फोटोंमध्ये स्वत:ने केलेले हेअरकट दाखवत आहे. सचिनचे हे नव्या लूकचे फोटो व्हायरल होत आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

From playing square cuts